मुकुंदनगरच्या डॉ. जाकिर हुसेन शाळेत स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा
सांस्कृतिक कार्यक्रमातून देशभक्तीचे दर्शन महापुरुषांच्या वेशभुषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील डॉ. जाकिर हुसेन मराठी प्राथमिक शाळा व म. अल्ताफ इब्राहिम माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. तर स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्मे, स्वातंत्र्य सैनिक व महापुरुषांच्या वेशभुषेत आलेल्या चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
प्रारंभी ध्वजारोहण करण्यात आले. डॉ. इम्रान शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या संचालिका डॉ. अस्मा शाहिद काझी, प्राथमिकचे मुख्याध्यापक समीउल्ला शेख, माध्यमिकचे मुख्याध्यापक एजाज शेख आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. विद्यार्थ्यांची देशभक्तीवर भाषणे झाली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगितले. डॉ. इम्रान शेख यांनी अल्पसंख्यांक समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक केले. विविध सांस्कृतिक व देशभक्तीवर घेण्यात आलेल्या उपक्रमांनी शाळेत स्वातंत्र्य दिवस साजरा झाला.