आली रे, आली लस आली

मोदींची नवी घोषणा दवाई भी और कडाई ,देशातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम

 संपूर्ण जगाच्या मानवजातीवर आलेलं कोरोना रोगाचं संकट दूर करण्यासाठी भारतात तयार झालेल्या को वॅक्सीन चे डोस आता भारतातील ३०  कोटी लोकांना देण्यात येणार आहेत. याचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिमोट्चे बटन दाबून करण्यात आला . यावेळी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि मुख्य लसीकरण केंद्र मोदी समवेत लाईव्ह व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे कनेक्टेड होती  भारतात सुरु झालेली ही लसीकरण मोहीम संपूर्ण जगात सर्वात मोठी लसीकरण मोहीम असेल . पहिल्या टप्प्यात ही लस देशातल्या ३० कोटी जनतेला देण्याचा मानस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवला . या लसीचे दोन डोस आहेत . आणि दोन्ही डोस घेणे अत्यावश्यक आहे तर आणि तरच तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीमध्ये आवश्यक ते बदल होणार असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. तेव्हा मोदी यांनी लस सोबत अत्यावश्यता या आशयाचा दवाई भी , कडाई भी असा नारा दिलाय . तसेच कोरोना लसीकरण झाल्यानंतर देखील देशवासीयांनी मास आणि सोशल डिस्टंसीग चे नियम पाळणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय .  या लसीच्या संशोधनात आणि निर्मितीत जे शास्त्रज्ञ , स्वयंसेवक आणि कर्मचाऱ्यांनी योगदान दिल त्या सर्वांचं नरेंद्र मोदी यांनी कौतुक करून आभार मानले .   सामान्यत: एक लस बनण्यासाठी अनेक वर्षे लागतात. पण एवढ्या कमी वेळात एक नाही तर दोन मेड इन इंडिया लस बनवल्या,” असं मोदी म्हणाले.  कोरोना लसीचे दोन डोस घेणं आवश्यक  आहे आणि   पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये जवळपास एक महिन्याचं अंतर  असलेलं पाहिजे . दुसरा डोस घेतल्याच्या दोन आठवड्यानंतरच तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीत आवश्यक बदल होणार आहेत अशी माहिती मोदी यांनी दिलीय .