जिजाऊ ब्रिगेडच्या अहील्यानगर जिल्हाध्यक्षपदी ॲड. स्वाती जाधव यांची नियुक्ती.

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या अहील्यानगर जिल्हाध्यक्षपदी ॲड. स्वाती जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून सिंदखेड येथे जिजाऊ जन्मोउत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी झालेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात ॲड. स्वाती जाधव यांना जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्षा शिवमती सीमा बोके यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष सुजाताई ठुबे, प्रदेश प्रवक्ता रेखाताई सूर्यवंशी, प्रदेश उपाध्यक्ष वर्षाताई माने, प्रदेश संघटक ताई बोराडे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशकार्याध्यक्ष शिवमती राजश्री शितोळे, प्रदेश कार्याध्यक्ष शीवमती विभावरी ताकट, प्रदेश महासचिव स्नेहा खेडेकर, संघटक डॉ. कल्पनाताई ठुबे, प्रदेश ज्येष्ठ मार्गदर्शिका नंदाताई शिंदे आदिसह पदाधिकारी उपस्थित होते.
ॲड. स्वाती जाधव हे नगर शहरातील सृष्टी कॉम्प्युटर व माऊली अभ्यासिकेच्या संचालिका असून जिजाऊ ब्रिगेडच्या सक्रिय सभासद म्हणून अनेक वर्षापासून काम करत आहेत. सृष्टी टायपिंग मध्ये गरजवंत विद्यार्थ्यांना मोफत टायपिंग शिकवली जाते व दरवर्षी ४ ते ५ विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचा वर्षभराचा शिक्षणाचा खर्च करण्याचा उपक्रमही गेला अनेक वर्षांपासून स्वाती जाधव हे करत आहेत. या सर्व सामाजिक कार्याची दखल घेऊन नगर शहर अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.
सत्काराला उत्तर देत अँड. प्रदीप जाधव म्हणाल्या की, जिजाऊ ब्रिगेड संघटन, निवडी, बांधणी व विस्ताराचे काम करणार आहे. तळगळापर्यंत जिजाऊ ब्रिगेड वाढवण्याचे काम करणार असल्याचे नूतन सांगितले. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या
पदाधिकाऱ्यांनी या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिले.