पूजा खेडकर प्रकरणामुळे होणार अनेकांचा पर्दाफाश

जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्रांचा घोटाळा जिल्हा रुग्णालयाची दिवसभर चौकशी

अहमदनगर :  पूजा खेडकर प्रकरणामुळे अनेक गंभीर बाबी नव्याने समोर आल्या होत्या त्यापैकी बोगस दिव्याग प्रमाणपत्रांच्या बाबतीत अनेक घटना समोर आल्या आहेत.  त्यामध्ये अहमदनगरमधील  जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्रांचा घोटाळा उघडकीस आल्याने नाशिकच्या आरोग्य उपसंचालकांनी नियुक्त केलेल्या समितीने मंगळवारी रुग्णालयात येऊन दिवसभर चौकशी केली. या समितीत चार सदस्यांचा समावेश होता. रुग्णालयात तपासणी न होता चार तरुणांना रुग्णालयाच्या नावाने ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र मिळाले आहे. हा प्रकार कसा घडला? याबाबत समितीने माहिती घेतल्याचे समजते. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी अनेक धडधाकट व्यक्तींना खैरे दिव्यांग प्रमाणपत्र दिले आहे. रुग्णालयातील तीन सदस्यीय बोर्ड द्वार, एकत्रित न बसता केवळ संबंधित तज्ज्ञ डॉक्टर व्यक्तीची तपासणी करून  त्याचे दिव्यांगपण तपासतात.  तपासणी अहवाल इतर दोन सदस्य  पाहतही नाहीत. त्यामुळे या रुग्णालयातील अनेक प्रमाणपत्रांत घोटाळा असल्याने सर्व दफ्तर तपासले जावे तसेच दिव्यांग विभागात प्रतिनियुक्तीवर काम करणाऱ्या कर्मचायांच्या तत्काळ बदल्या करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर दिव्यांग प्रमाणपत्रांचे कामकाज लिपिक वर्गातील कोणत्या कर्मचाऱ्यांनी पाहावे याचे वाटप करणारा लेखी आदेश नुकताच डॉ. संजय घोगरे यांनी काढला आहे. यापूर्वी हे कामकाज लेखी आदेशावरून चालत होते की तोंडी आदेशावरून, ही माहिती समजू शकलेली नाही. दरम्यान, या काम वाटपात दिव्यांग विभागाचे काम पुन्हा त्याच त्या ठराविक कर्मचाऱ्यांकडे सोपविण्यात आले. या विभागात कायम सेवेतील ठराविक कर्मचारी वर्षानुवर्षे कार्यरत आहेत. दुसरीकडे हे जोखमीचे काम कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे देऊ नये अशी मागणी असताना त्याच्याकडेच कामकाज दिले. तपासणीची ही पद्धतच बेकायदेशीर असून, तज्ज्ञ डॉक्टर योग्य तपासणी करतात की नाही याची शहानिशाच होत नाही. ही बाब विशेष लक्षात घेण्यासारखी आहे