कागद, काच, पत्रा, कष्टकरी पंचायतच्या वतीने मनपा आयुक्त यांना निवेदन.

घंटागाडीचे ठेकेदार व कर्मचाऱ्यांची कचरा वेचाकावर अरेरावीची भाषा.

कचरा वेचकावर उपासमारीची वेळ.

नगर (प्रतिनिधी)- शहर हद्दीमध्ये व उपनगरात पडणारा कचरा संकलन करण्याचे काम एका खाजगी ठेकेदाराला मनपाने दिलेले आहे. या ठेकेदाराचे गुंड प्रवृत्तीचे लोक या कचरा वेचकांना सुका कचरा गोळा करण्यास मनाई करत आहे व त्यांना शिवीगाळ करून घंटागाडी मधील सुका कचरा भरल्यास तुला कचरा संकलनाच्या कॉम्पॅक्टरमध्ये ढकलून देईल अशी धमक देत आहे. व घंटागाडी वरील कामगारास दरमहा पगार चालू असून देखील तो सुका कचरा गोळा करून त्यातूनही पैसे कमवत आहे. त्यामुळे सदरील कचरा वेचकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे नगर शहरांमध्ये सुमारे ३०० कचरा वेचक हे सुका कचरा गोळा करण्याचे काम करतात हे मनपाचे कर्मचारी नाहीत परंतु हे शहरासह उपनगरातील स्वच्छतेच्या कामास मदतच करत असतात घंटागाडी मध्ये सुका कचरा घेण्यास गेल्यास तेथील लोक दमबाजी करतात त्यामुळे कचरा वेचक हे गेल्या ३०-४० वर्षापासून कचरा वेचकाचे काम करत आहे कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत गेल्या अनेक वर्षापासून या कामगारांना महापालिका घनकचरा व्यवस्थापनामध्ये समावेश करून घ्यावा यासाठी काम करत आहे सदर महापालिकेमार्फत कचरा वेचकांना ओळखपत्र मिळणे संदर्भात कार्यवाही चालू आहे. मात्र ठेकेदारांमार्फत १०० ते १५० परप्रांतीय कामगार आणून सदर काम केले जाते आणि स्थानिक कामगारांना मात्र रोजगारापासून वंचित ठेवले जाते. राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो यांच्यामार्फत कचरा वेचकांना घनकचऱ्यात समावेश करून घेण्याबाबत वेळोवेळी शासन निर्णय देण्यात आलेले आहे. परंतु शासकीय नियमास गाळून परप्रांतीय कामगार आणून स्थानिक कामगारांवर अन्याय केला जात असल्याने या कचरा वेचकांना दमबाजी करणाऱ्या ठेकेदारावर व गुंड व्यक्तींवर कारवाई करून कचरा वेचक कामगारांना घंटागाडी मधील सुका कचरा गोळा करण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे जिल्हा समन्वयक विकास उडानशिवे, कचरा वेचक मंदा शेलकर, लक्ष्मी राजपूत, कीर्ती गायकवाड, मीना वैरागर, शितल चांदणे, अनुसया सोनवणे, सविता शिरोळे, लखाबाई शिंदे, कालींदा थाडगे, मंगल चखाले, सुनिता उल्हारे, मनीषा घोरपडे, अनिता लोंढे, मंगल पाथरे, सागर घुडे, विकास धाडगे, विकास वाल्हेकर, बाळू खुडे, अजय गायकवाड, पवन शेरकर आदी उपस्थित होते.
चौकट – अहिल्यानगर महानगर पालिका वगळून पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, वर्धा, मुम्बई, अश्या सर्व महानगर पलिकेने कचरा वेचक याना घन कचरा वेवस्थपना मध्ये समावेश करून घेतलेले आहे.