काजवा बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आंबेवंगणयेथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
नगर – अहमदनगर जिल्ह्यातील काजवा बहुद्देशीय संस्थे मार्फत जिल्हा परिषद शाळा आंबेवंगण येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रविणकुमार धांडे, सचिव राम लोटे, खजिनदार सपना धांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली काळे यांनी या विद्यार्थ्यांना लॅपटॉप बॅग, कम्पास बॉक्स, वह्या, अंकलीप्या व इतर आवश्यक असे शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष प्रविणकुमार धांडे म्हणाले कि, आजच्या धकाधकीच्या जीवनात पालकांवर येणार्या शिक्षणाचा खर्चाचा बोजा कमी करण्याचा छोटासा प्रयत्न प्रत्येक वर्षी काजवा संस्था करत असते. प्रत्येक वर्षी जमेल तितक्या जास्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन काजवा संस्था शैक्षणिक क्षेत्रात आपले योगदान देत आहे.
काजवा संस्थेच्या वतीने आदिवासी भागात आणखी सामाजिक कार्याची मोहीम राबवणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. कार्यक्रमास गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य मंडळ, ग्रामसेवक, तसेच ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवली व आयोजकांचे आभार मानले.