सामाजिक कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांसाठी शहरात कार्यशाळेचे आयोजन
शासनाचे धोरण, शासकीय अनुदान, कायदे व सीएसआर फंड मिळविण्यासंदर्भात केले जाणार मार्गदर्शन
ज्ञानरचना सोशल फाऊंडेशन व गुरुसाई फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम
नगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांसाठी शासनाचे धोरण, शासकीय अनुदान, कायदे व सीएसआर फंड मिळविण्यासंदर्भात ज्ञानरचना सोशल फाऊंडेशन व गुरुसाई फाऊंडेशनच्या वतीने एन.जी.ओ., सी.एस.आर. व निधी संकलनावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचा सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी लाभ घेण्याचे आवाहन संस्थेच्या संचालिका सुप्रिया चौधरी, प्रविण साळवे व सारीका शेलार यांनी केले आहे.
बुधवारी 22 जानेवारी रोजी ही एकदिवसीय कार्यशाळा अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत सी.ए. शंकर अन्दानी, कर सल्लागार दीपक चौधरी, ॲड. अर्जुन भीमराव काळे हे तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत.
सामाजिक कार्य करत असलेल्या स्वयंसेवी संस्थांना ही कार्यशाळा नवी दिशा देणारी ठरणार आहे. या कार्यशाळेत सामाजिक शैक्षणिक व देवस्थान संस्था नोंदणी प्रक्रिया व कायदेविषयक मार्गदर्शन केले जाणार आहे. तर सेक्शन -8 कंपनी नोंदणी प्रक्रिया व शासकीय योजना माहिती, इन्कम टॅक्स, ऑडिट प्रक्रिया, 12 ए आणि 80 जी नोंदणी, सी.एस.आर. कायदा व निधी मिळवण्याच्या पद्धत, सी.एस.आर. निधी कसा मिळवावा?, सी.एस.आर. कंपनी संदर्भात माहिती कशी मिळवावी? व एफ.सी.आर.ए. नोंदणी व कायदेविषयक माहिती कार्यशाळेत दिली जाणार आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक असून, 9423673591 या नंबरवर संपर्क साधून नोंदणी करण्याचे म्हंटले आहे.