अहमदनगर महाविद्यालय अंतर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन संपन्न

कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना रोजगार प्राप्ती संधी- विलास टेमकर

अहमदनगर: अहमदनगर महाविद्यालय भास्कर पांडुरंग हिवाळे सरांनी घेतलेला वारसा पुढे चालवत आहे. आजही ग्रामीण भागातील तरुणांना या कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून आपल्या कौशल्य विकसित करण्याची व त्यातून रोजगार प्राप्तीची संधी ग्रामीण युवकांना प्राप्त होणार आहे. जी जमेची बाजु आहे, या संधीचे सोने विद्यार्थ्यांनी केले पाहिजे. आज आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकप्रतिनिधींना बोलवून उचित सन्मान केला हा सन्मान माझा नसून सामान्य जनतेचा आहे, असे प्रतिपादन भोरे पाथर्डीचे सरपंच विलास टेमकर यांनी केले. प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांच्या मागदर्शनाखाली आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्राच्या उदघाटनाची तयारी करण्यात आली. याप्रसंगी लोकप्रतिनिधी म्हणून भोरे पाथर्डीचे सरपंच विलास टेमकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपप्राचार्य प्रा.दिलीप कुमार भालसिंग, प्रा.सुरेश घुले, प्रा.डॉक्टर अभिजीत कुलकर्णी आणि संदीप साळवे उपस्थित होते.

विनाअनुदान विभागाचे समन्वयक प्रा.डॉ.सय्यद रज्जाक यांनी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा उद्देश यामधील मान्य प्राप्त जी.एस.टी असिस्टंट आणि डोमेस्टिक डाटा एन्ट्री ऑपरेटर या दोन अभ्यासक्रमांना प्रति ६० विद्यार्थी प्रवेशित करण्याची परवानगी मिळालेली असून सर्व शाखेतील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना यासाठी प्राधान्य दिले जाईल. जो विद्यार्थी प्रथम संपर्क साधेल त्याला प्रथम प्रवेश दिले जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्वरित प्रा.डॉ. भागवत परकाळ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले. संबंधित कोर्स साठी विद्यार्थ्यांकडून कोणत्याही स्वरूपाची फीस आकारली जाणार नाही अशी माहिती त्यांनी याप्रसंगी दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार पिटर चक्रनारायण बांगर सर यांनी प्रयत्न केले. तसेच तांत्रिक सहाय्यासाठी संगणक विभागाचे वैभव वाबळे यांनी परिश्रम घेतले. मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.