काव्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी खासदार लंके यांची निवड

निमगाव वाघात शिक्षक दिनी रंगणार काव्य संमेलन

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे शिक्षक दिनानिमित्त रविवार दि.8 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सहाव्या राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी खासदार निलेश लंके यांची निवड करण्यात आली आहे.
संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र काव्य संमेलनाचे संयोजक तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी खासदार लंके यांना दिले. यावेळी रविंद्र जाधव, नगर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन साहेबराव बोडखे, शिवा पाटील होळकर, पै. वसंत पवार, अतुल फलके, रामदास पवार, अतुल जाधव आदी उपस्थित होते.
निमगाव वाघा येथील परिवार मंगल कार्यालयात 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता शिक्षक दिनानिमित्त रंगणाऱ्या काव्य संमेलनात शिक्षक व गुरुजनांवर कवितांचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये नवोदित कवी व नामवंत कवींचा सहभाग असणार आहे. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करुन विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षकांना व निस्वार्थ भावनेने सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.