केजीएफ (KGF) या सुपरहिट चित्रपटाचा दुसरा भागाच्या निर्मात्यांनी “केजीएफ 2” चे नवीन पोस्टर शेअर करत, टीझरच्या रिलीजची तारीखही जाहीर केली आहे.“केजीएफ 2” चा टीझर 8 जानेवारी 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. ही बातमी आल्यापासून केजीएफचे चाहते खूप उत्साही झाले आहेत. या पोस्टरमध्ये यश खुर्चीवर बसलेला आहे आणि तो खूप रागाने बघत आहे. दिग्दर्शक प्रशांत नील यांनी पोस्टर शेअर करताना लिहिले होते की, ‘8 जानेवारीला सकाळी 10.18 वाजता साम्राज्याची झलक पहा. यासाठी कदाचित वेळ लागला असेल, परंतु आम्ही आणखी स्ट्रॉन्ग होऊ आला आहोत ‘यापूर्वी यशने चित्रपटाचा पहिला लूक शेअर केला होता. या पोस्टरमध्ये यशच्या तोंडात सिगारेट आहे आणि एका हाताने काहीतरी जड ओढून उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहे. हे पोस्टर शेअर करताना यशने लिहिले होते की, ‘साम्राज्याला पुन्हा तयार करताना’ यशसोबत संजय दत्त आणि रवीना टंडनदेखील या चित्रपटात दिसणार आहेत.
