नगरमध्ये गोवंशीय मासाची वाहतूक करणाऱ्याला कोतवाली पोलिसांनी घेतले ताब्यात:५ लाख २० हजार रु.किमतीचा मुद्देमाल जप्त

५,लाख २०हजार रुपयाचा मुददेमाल जप्त करुन एका आरोपीस केले अटक

अहमदनगर शहरामधून अवैध गोवंशीय मांसाची विक्री करण्याच्या उददेशाने वाहतुक करतांना कोतवाली पोलीसांनी घेतले ताब्यात घेऊन ५,लाख २०हजार

रुपयाचा मुददेमाल जप्त करुन एका आरोपीस केले अटक मा.श्री मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा.श्री सौरभ कुमार अग्रवाल अपर

पोलीस अधीक्षक सो अहमदनगर व मा.श्री विशाल ढमे, उपविभागीय पोलीस अधिकारी सो नगर शहर विभाग अहमदनगर यांनी अहमदनगर जिल्हयात कोणतेही अवैध धंदे चालणार नाहीत

त्या अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचना प्रमाणे पोलीस स्टेशन हददीत श्री.राकेश मानगांवकर, पोलीस निरीक्षक साहेब यांनी गुप्त बातमीदारा मार्फत माहिती घेऊन दिनांक १९/११/२०२० रोजी पहाटे ०३:४५ वा.सुमारास बाबा बंगाली कारी मश्जिद जवळ अशोक लेलंड कंपनीचा निळसर टॅम्पो नंबर एम.एच.०३/ ए.एच.६०५५ मध्ये गोवंशी मांस विक्री करण्यासाठी घेऊन जात असतांना सदर टॅम्पो चालक नामे अल्तमश नासीर पठाण वय २३ वर्ष रा.मुकंदनगर अहमदनगर यास दोन पंचासमक्ष ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुमारे ११००किलो वजानाचे गोवंशीय मांस व टॅम्पो असा एकुण ५ लाख २० हजार रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच सदर चालकाकडे विचारपुस केली असता सदरचे मांस हे आरोपी नामे १) फैजल कुरेशी २) मोसीन कुरेशी दोन्ही रा.झेंडीगेट अहमदनगर (पुर्ण नाव पत्ते माहित नाही ) यांचे असल्याचे सांगितले आहे.

व सदर आरोपीत पो.कॉ./२६१७ सुशील विजय वाघेला नेमणूक कोतवाली पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 1 ६१६४ /२०२० भा.द.वि. कलम २६९.३४ सह महाराष्ट्र पशु संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ चे कलम ५( क), ९ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्हयाचा सपोनि पवार नेमणुक कोतवाली पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा.श्री मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा. श्री सौरभ कुमार अग्रवाल , अपर पोलीस अधीक्षक सो अहमदनगर व मा.श्री विशाल दुमे उपाविभागीय पोलीस अधिकारी सो नगर शहर विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शना खाली कोतवली पोलीस स्टेशनचे श्री राकेश मानगांवकर, पोलीस निरीक्षक,सपोनि विवेक पवार, पो.ना/२२०० योगेश भिंगारदिवे, पो.ना/१४२९ शाहिद शेख ,पोना/२०८४ गणेश धोत्रे, पो.का. २४८६ सुजय हिवाळे, पोकॉ/१७९६ सुमित गवळी, पोको /१४९३ भारत इंगळे, पोकॉ/२४६९ सोमनाथ राऊत, पो.कॉ./२६१७ सुशील वाघेला यांनी केलेली आहे.

तरी याव्दारे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, कोतवाली पोलीस स्टेशनच्या हददीमध्ये कोठेही अवैध धंदयाबाबत माहिती असल्यास ती कोतवाली पोलीस स्टेशन येथे दयावी. जेणे करुन योग्य ती कायदेशीर कारवाई करता येईल.