‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी जिल्ह्यातून सात लाख ऑनलाईन अर्ज

नगर : महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा होण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. आजपर्यंत सात लाख महिला लाभार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन भरून घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची गतीने अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसीय विशेष मोहीम राबवण्यात आली. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी प्राप्त झालेल्या महिलांच्या अर्जांची छाननी जलद गतीने भावी ह्या दृष्टीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तालुकास्तर, तहसीलदार, बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्वतंत्र कक्ष सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी जिल्ह्यातून सात लाख ऑनलाईन अर्ज आलेले आहेत.