दिल्ली क्राइम वेब सीरिजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !

दिल्ली:  
भारतातील नागरिकांच्या पसंतीला उतरलेली  सर्वोत्कृष्ट वेब सीरिज दिल्ली क्राइमने नुकताच आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार जिंकला आहे.   ही वेब सीरिज २०१२ मध्ये दिल्लीतील सामूहिक बलात्कारावर आधारित आहे.   ज्यामध्ये या प्रकरणाशी संबंधित संपूर्ण पोलिसांचा तपास दाखवण्यात आला आहे.

या वेब सिरीजमध्ये शेफाली शाह, राजेश तैलंग, रसिका दुगल आणि आदिल हुसेन मुख्य भूमिकेत होते.  आता या वेब सीरिजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती राजेश तैलंग यांनी दिली आहे.