कॅल्क्युलेटरने करा कर्जाचे नियोजन!

लोन काढताना त्याचा हप्ते, मुदत, रक्कम आदींचे नियोजन आधीच केलेले बरे असते. बँकांनी यासाठी ईएमआय कॅल्क्युलेटरसारखी सुविधा वेबसाइट्स आणि इतर वित्तीय प्लॅटफॉर्म्सवर दिली. या कॅल्क्युलेटरमुळे कर्ज घेणाऱ्यांना मासिक हप्त्यांची गणना करण्यास आणि त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार कर्जाची रक्कम आणि कालावधी ठरविण्यास मदत होते. विविध बँकांचे कर्जावरील व्याजाचे दर वेगवेगळे असल्याने ईएमआयमध्ये होणारी वाढ किंवा घट याचे लगेच आकलन करण्यासाठी हे कॅल्क्युलेटर उपयुक्त ठरते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगच्या नव्या तंत्रज्ञानामुळे हे कॅल्क्युलेटर कर्ज घेणाऱ्यांना त्यांच्या आर्थिक स्थितीनुसार योग्य सल्लाही देऊ शकणार आहे.