जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संकल्पनेतून ‘लोकशाहीची शाळा’ उपक्रम

१० ते १७ ऑक्टोबर दरम्यान आयोजन

अहमदनगर जिल्ह्यात येत्या विधानसभा निवडणुकीत मतदार जनजागृतीतून मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संकल्पनेतून जिल्हा स्वीप समितीच्या वतीने शाळा व महाविद्यालयीन स्तरावर ‘लोकशाहीची शाळा’ या लोक उत्सवाचे १० ते १७ ऑक्टोबर २०२४ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. उत्कृष्ट उपक्रम राबवणाऱ्या शाळा महाविद्यालयांना ‘ लोकशाहीची शाळा ‘ या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. १० ऑक्टोबरला ईव्हीएम डे आयोजित करताना ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन विषयक जनजागृती ११ ऑक्टोबर पोलिंग बुथ डेच्या माध्यमातून मतदान केंद्राची अंतर्गत व बाह्यरचना जनजागृती, १४ ऑक्टोबर-फॅसिलिटी  डेच्या आयोजनाद्वारे मतदान केंद्रांवर पुरवल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांबाबत जनजागृती, १५ ऑक्टोबर – पोल रीडेद्वारे शाळेतील वर्गामधून मॉनिटर व इतर वर्ग प्रतिनिधींची वर्गांतर्गत निवडणुकीतून व अभिरूप मतदानातून निवड करणे, १६ ऑक्टोबर – डी फॉर डेमोक्रसी डान्स डे आयोजित करून भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांनी प्रसारित केलेल्या दोन गीतांवर नृत्य सादरीकरण, १७ – ऑक्टोबर -पॅरेंट डे द्वारे पालक मेळाव्यातून – लोकशाहीत पालकांच्या सहभागाबाबत जनजागृती, मतदार जनजागृती शपथ घेण्यात येईल.अशी माहिती देण्यात आली आहे.