छत्तीसगड तेलंगणामध्ये काँग्रेसला काठावरचे बहुमत मिळेल तर मध्य प्रदेश राजस्थान मध्ये भाजप सत्तेवर येईल. असा निष्कर्ष बहुतांश जन्मता चाचण्यांमधून काढण्यात आला आहे. मिझोराममध्ये मिथुन नॅशनल फ्रंट व झोराम पीपल्स मुव्हमेंट यांच्यात बहुमत मिळवण्यासाठी मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, राजस्थान, मिझोराम या पाच राज्यांसाठीची मतदान प्रक्रिया गुरुवारी संपली. त्यानंतर संध्याकाळी विविध संस्थांनी आपापल्या जनमत चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर केले. या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी तीन डिसेंबरला होणार असून त्याचवेळी निकाल जाहीर होतील, आता त्याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. 230 सदस्य असलेल्या मध्य प्रदेशमध्ये सध्या भाजपात राजस्थान छत्तीसगड मध्ये काँग्रेस सत्तेवर आहे. तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समिती हा पक्ष गेली दहा वर्षांपासून सत्तेत आहे. मिझोराम मध्ये मिझो नॅशनल फ्रंटचे सध्या सरकार आहे. मात्र विधानसभा निवडणुकांच्या निकालांमध्ये काही राज्यात भाजप तर काही राज्यात काँग्रेसचे सत्ता येण्याची शक्यता आहे. सात नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत पाच राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी विविध टप्प्यांवर मतदान पार पडले होते.