राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद.

अहिल्यानगरच्या लेकी चमकल्या; महाराष्ट्राचे केले प्रतिनिधित्व

नगर (प्रतिनिधी)- टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने मथुरा (उत्तर प्रदेश) येथे 19 वर्षे वयोगटात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत अहिल्यानगरच्या मुलींच्या संघाने विजेतेपद पटकाविले. सदर मुलींच्या संघाने राज्यात प्रथम येऊन महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते.
नुकतेच झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने अंतिम सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत उत्तर प्रदेशचा 35 धावांनी पराभव करून राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकाचे विजेतेपद मिळविले. महाराष्ट्राच्या संघात सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय राहुरी कृषी विद्यापीठाच्या 11 मुलींचा सहभाग होता, तर महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून सावित्रीबाई फुले विद्यालयाचे क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक घनश्‍याम सानप यानी काम पाहिले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत पाटील, शिक्षण मंडळाचे सचिव महानंदजी माने, खजिनदार महेश घाडगे, सावित्रीबाई फुले विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपविहिरे, उपप्राचार्य बाळासाहेब डोंगरे, पर्यवेक्षक मनोज बावा, टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष कन्हैया गुजर, राज्य तसेच राष्ट्रीय टेनिस क्रिकेटच्या सचिव मीनाक्षी गिरी, धनश्री गिरी, अहिल्यानगर टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष केशव नागरगोजे, खजिनदार संदीप घावटे आदींनी अभिनंदन केले आहे.

राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकाविणारे महाराष्ट्राच्या मुलींचा संघ पुढीलप्रमाणे:-
अक्षदा बेलेकर (कर्णधार), स्वामिनी जेजुरकर, ऐश्‍वर्या चौरसिया, वृषाली पारधी, मृणाल ननवरे, सिमरन शेख, संतोषी भिसे, प्रणाली पानसंबळ, साक्षी बनकर, श्रावणी ढगे, राशी पवार, धनश्री शेडगे,