आपसातील वादामुळे ३६ जागांवर महायुती आणि महाविकास यांचे ‘वेट अँड वॉच’!
विधानसभेच्या राज्यातील ३६ जागा अशा आहेत की, जिथे महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हींनी अद्याप उमेदवार दिलेले नाहीत. २५२ जागा अशा आहेत, जिथे दोन्हींनी किंवा त्यापैकी एकाने उमेदवार दिले आहेत. या ३६ पैकी १३ जागा या विदर्भातील आहेत. त्यात आकोट, अकोला पश्चिम, कारंजा, मेळघाट, मोर्शी, आर्वी, सावनेर, उमरेड, गडचिरोली, चंद्रपूर, आर्णी, वरोरा आणि उमरखेडचा समावेश आहे. नांदेड दक्षिण, देगलूर, मालेगाव मध्य, डहाणू, वसई, भिवंडी पूर्व, कल्याण प., उल्हासनगर, बोरीवली, वर्सोवा, मानखुर्द शिवाजीनगर, शिवडी, पेण, खडकवासला, पुणे कँटोन्मेंट, श्रीरामपूर, बीड, माढा, सोलापूर मध्य, पंढरपूर, माळशिरस, फलटण, कोल्हापूर उत्तरमध्ये दोघांनीही उमेदवार जाहीर केलेले नाहीत. दोन्ही बाजूंनी उमेदवार जाहीर न होण्यामागे काही कारणे सांगितली जातात. आर्वीत आमदार दादाराव केचे की, सुमित वानखेडे हा निर्णय झालेला नाही. मविआकडून वर्धेचे खासदार अमर काळे यांच्या पत्नी मयुरा यांना उमेदवारी मिळू शकते. सावनेरमध्ये आमदार सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा या काँग्रेसच्या उमेदवार असतील, हे जवळपास स्पष्ट आहे. भाजपचा उमेदवार ठरायचा आहे.
◈ किती जागा आहेत अजून बाकी?
◆ महायुतीचे अद्याप ९९ उमेदवार जाहीर व्हायचे आहेत. महाविकास आघाडीच्या १३० जागा अद्याप जाहीर व्हायच्या आहेत. उमेदवार जाहीर करण्याबाबत सुरुवातीपासूनच महायुतीने आघाडी घेतली आहे.
◆ दोन्हींनी उमेदवार दिलेले नाहीत, अशा ३६ मतदारसंघांपैकी ७ मतदारसंघ असे आहेत की, जिथे २०१९ मध्ये दोन्हींना विजय मिळाला नव्हता. तेथे अपक्ष वा लहान पक्षांचे उमेदवार जिंकले होते. त्यात
प्रहार, एमआयएम, बहुजन विकास आघाडी, अपक्ष आमदारांचा समावेश आहे.