मानसी गायकवाड हिने गणपती महालाचा साकारला घरगुती देखावा
देखाव्यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळुंज (ता. नगर) येथील मानसी प्रशांत गायकवाड हिने गणेशोत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत गणपती महालाचा घरगुती देखावा साकारुन आकर्षक सजावट केली आहे. गणपतीच्या मुर्ती भोवती विविध रोप ठेऊन महालाची प्रतिकात्मक सजावट करण्यात आलेली आहे.
मानसी ही आर्किटेक्ट असून, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांची ती कन्या आहे. तिला प्राचार्या सोनल गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.