मानव फाऊंडेशन आय एस आय ब्लड बैंक व रोटरॅक्ट क्लब वारजे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन

कोवीड 19 मुळे रक्ताचा होणारा तुटवडा लक्षात घेऊनच कार्यक्रमाचे आयोजन

पुणे:

मानव फाऊंडेशन , आय एस आय ब्लड बैंक व रोटरॅक्ट क्लब वारजे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. कोवीड 19 मुळे रक्ताचा होणारा तुटवडा लक्षात घेऊनच या संस्थानी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

पुण्यातील शिंदे सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श शिक्षिका पुष्पा कनोजिया, ॲड. किशोर शिंदे, प्रशांत कनोजिया, रामभाऊ बांगर, संजय काळे, डाॅ. अनामिका उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया ढुमे व सचिन पै यांनी केले.  मानव च्या संस्थापक अध्यक्ष म्रिती अग्रवाल व रोटरॅक्ट क्लब वारजे चे अध्यक्ष संकेत अग्रवाल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले.


हा कार्यक्रम यशस्वी करण्यात दोन्ही संस्थाचे सर्वच सभासदांकडून विषेश प्रयत्न करण्यात आले. व या उपक्रमासाठी रुचिता चौधरी व इशा गोरे व वामन जहागीरदार यांनी सहकार्य केल. कार्यक्रमात सर्व सोशल डिस्टंसिग च्या नियमांचे पालन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इशा गोरे यांनी केले.