नगरच्या मनीषा गायकवाड यांचा कराडच्या कला साहित्य संमेलनात गौरव
शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल ग्लोबल आयडियल इन्स्पायरिंग टीचर अवार्डने सन्मानित
अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात देत असलेल्या योगदानाबद्दल भिंगार हायस्कूलच्या पर्यवेक्षिका मनीषा प्रफुल्ल गायकवाड यांना कराड (जि. सातारा) येथे झालेल्या राष्ट्रीय शिव सह्याद्री कला साहित्य संमेलनात ग्लोबल आयडियल इन्स्पायरिंग टीचर अवार्डने गौरविण्यात आले.
धन्वंतरी जनकल्याण सामाजिक संस्था सातारा व समृद्धी प्रकाशन व सावली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक क्षेत्रासह निस्वार्थपणे सामाजिक योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील व्यक्तींचा या संमेलनात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गौरव करण्यात आला.
गायकवाड या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मागील 28 वर्षापासून योगदान देत आहेत. समाजातील गरजू विद्यार्थी व महिलांना ते नेहमीच आधार देण्याचा काम करत असतात. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवले असून, ते आज उच्च पदावर कार्यरत आहेत. शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना कराड (जि. सातारा) येथे मिळालेल्या ग्लोबल आयडियल इन्स्पायरिंग टीचर अवार्डबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.