मनोज जरांगेचे चार जून पासून पुन्हा बेमुदत उपोषण

आठ जून रोजी नारायण गडावर सभा

राज्य सरकारने दहा टक्के दिलेलं आरक्षण फसव निघालं. याचा मराठा समाजाला फायदा झाला नसल्याने चार जून रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला मनोज जरांगे बसणार आहे. आठ जूनला नारायण गडावर मराठा समाजाची सभा होणार आहे. या सभेची पाहणी करण्यासाठी बुधवारी नारायण गडावर ते जाणार आहे. तसेच ओबीसीतून आरक्षण दिलं नाही. तर विधानसभेत 288 जागा लढवणार. असा अल्टिमेटम मराठा नेते मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. बुलंद छावा मराठा युवा परिषद प्रणित छत्रपती संभाजीराजे यांच्या 337 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या एन 11 ते टीव्ही सेंटर चौक दरम्यान मिरवणुकीच्या उद्घाटनासाठी जरांगे मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला जरांगे यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं. ते म्हणाले, त्यांनी मराठा समाजाच्या माता भगिनींचे डोकं फोडलं तरुणांवर गुन्हे दाखल केले, महिलांना तडीपार केलं, फडणवीस यांनी मराठ्यांचा द्वेष सोडावा असा आवाहन जरांगे यांनी यावेळी केलं.