मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठीचा सर्वत्र डंका : मुख्यमंत्री

मराठी भाषा भवनासह अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन

माय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने आता मराठीचा डंका अधिक जोमाने सर्वत्र गाजणार आहे. मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी मुंबईत होत असलेले मराठी भाषा भवन उत्तम आणि दर्जेदार व्हावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली, तसेच भाषा भवनाच्या माध्यमातून मराठी भाषा अधिक सम्मृद्ध आणि प्रगल्भ करण्यासाठी केले. चर्नी रोड येथील जवाहर बाल भवन परिसरात उभारण्यात येणाऱ्या ‘मराठी भाषा भवन’सह विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनीही मनोगत व्यक्त केले . तर यावेळी बोलताना केसरकर म्हणाले,  मुंबईत येणाऱ्या साहित्यिकांसाठी राहण्याची सोय व्हावी यासाठी कवी मंगेश पाडगावकर यांच्या नावाने नवी मुंबईतील ऐरोलीत साहित्य भवन बांधण्यात येणार आहे.  तसेच सातारा येथे विश्वकोश मंडळासाठी नवीन इमारत, प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव होणार असल्याचीही माहितीही त्यांनी दिली