सकल मातंग समाजाचा महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांना पाठिंबा.

नगर (प्रतिनिधी)- नगर शहरात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सकल मातंग समाजाचे मुंबई येथील समन्वयक मारुती वाडेकर, एस एस धूपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सचिव अँड. राम चव्हाण, राजेंद्र आढागळे, डी.एम. झोंबाडे, सुरेश साळवे, भारत पवार हे म्हणाले की, सकल मातंग समाजासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी मातंग समाजाच्या अनेक प्रलंबित मागण्या मान्य करणार असल्याचे आश्वासन दिले व अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व मागण्या मंजूर केले त्यामुळे आम्ही सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याच्या समन्वयक महायुतीच्या उमेदवारांसाठी पाठिंबा देऊंन मुंबई, ठाणे, नाशिक व नगर येथे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी आलो असून सकल मातंग समाजाला महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी आव्हान केले आहे.
तसेच मा.सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी अनुसूचित जातीमध्ये आरक्षण वर्गीकरण करण्याचा राज्यांना अधिकार असल्याचा ऐतिहासिक निकाल देऊन आरक्षणापासून वंचित राहिलेल्या जातींना सामाजिक न्याय दिला. महायुती सरकारने तातडीने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची दखल घेऊन १५ ऑक्टोंबर २०२४ रोजीच्या जीआर शासन निर्णय काढून अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण करण्याचा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी ३ महिन्याचा कालावधी देऊन उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती स्थापन केली. तसेच मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांच्या उच्च दर्जाच्या शिक्षण प्रशिक्षण व संशोधनासाठी माहिती सरकारनं १५० कोटी रुपयांची तरतूद करून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची आर्टी निर्मिती केली. व क्रांती ग्रुप लहुजी साळवे यांच्या पुण्यातील स्मारकासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करून ८७ कोटी वितरित करून स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या चिराग नगर घाटकोपर मुंबई येथील स्मारकासाठी ३०५ कोटी रुपयांची तरतूद करून हा अत्यावश्यक प्रकल्प म्हणून कॅबिनेटची मंजुरी घेतली आहे तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे वाटेगाव या जन्मस्थळाचा विकास करण्यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद केली. व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला भरघोस निधी दिला व क्रांती गुरु लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या ज्या १९ शिफारशी महामंडळाशी संबंधित होत्या त्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करून प्रत्यक्ष ६० कोटी रुपये सुपूर्द करण्यात आले तसेच महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर विधान परिषदेवर आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने मातंग समाजाच्या एकाही कार्यकर्त्याला स्थान दिले नव्हते विद्यमान महायुती सरकारने विधान परिषदेवर आमदार करून प्रथमच मातंग समाजाला प्रतिनिधित्व दिले व रशियामध्ये मॉस्को या राजधानीच्या शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे पुतळ्याची स्थापना केली महाराष्ट्राचे विधान भवन आणि मंत्रालय मधील चौकाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव दिले विशेष महत्त्वाची बाब क्रांती सम्राट डॉ.बाबासाहेब गोपले यांच्या चळवळीतून मातंग समाजाला मिळालेले यश लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आहे व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार व मुलुंड येथील मुलींच्या शासकीय वस्तीगृहाला मुक्ता साळवे असे नामकरण करण्यात आले. व मातंग समाजाचे जवळपास सर्वच प्रश्न सोडवल्याने महायुती सरकारने निर्णायक भूमिका घेतल्यामुळे मातंग समाजाने कर्तव्य भावनेने २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी मातंग समाजाचे समन्वयक मारुती वाडेकर, एस.एस.धूपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सचिव अँड. राम चव्हाण, राजेंद्र आढागळे, डी.एम. झोंबाडे, सुरेश साळवे, भारत पवार, सुभाष वाघमारे, तुषार वाघमारे, काळोखे अण्णा, अशोक भोसले, पांडुरंग घोरपडे, मोहन बुलाखे, हरिश्चंद्र खरात, पोपटराव पाथरे, सुनील सकट, संतोष शिरसाठ आदीसह सकल मातंग समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.