दूध अनुदानात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ : विखे

1 ऑक्टोबर 2024 पासून 28 दर देणे बंधनकारक

राज्यातील सहकारी व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना प्रतिलिटर ₹7 याप्रमाणे अनुदान मिळेल. वाढीव अनुदान योजनेमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 35 रुपये दर भाव मिळेल अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली मंत्री विखे यावेळी म्हणाले दूध उत्पादकांची अडचणी पाहता दुधाला वाढीव भाव मिळावा यासाठी मंत्रिमंडळून आपण सातत्याने पाठपुरावा आणि प्रयत्न करत आहोत या अगोदर प्रतीक प्रति लिटर पाच रुपये अनुदान देऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना आपण दिलासा दिला होता आंतरराष्ट्रीय बाजारातील दुधाची भुकटी आणि बटरचे दर अद्यापही स्थिरावलेले नाही त्यामुळे राज्य दुधाला योग्य दर मिळणं कठीण झाला आहे यातच शासनाचे अनुदान योजना 30 सप्टेंबर पर्यंत सुरू ठेवली जाणार होती त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत आला असता त्यामुळे हा निर्णय सध्या घेण्यात आला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत दूध अनुदान योजनेला मुदतवाढ आणि सात रुपये अनुदान देण्याचा प्रस्ताव आणला त्याच मंत्रिमंडळाने मान्यता दिली महायुती सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने हा निर्णय घेण्यात आला. एक ऑक्टोबर पासून वाढीव अनुदान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खातात थेट खात्यात थेट वर्ग केले जातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध संघांनी 1 ऑक्टोबर 2024 पासून 28 रुपये प्रति लिटर दर देणे बंधनकारक राहणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने सात रुपये प्रति लिटर प्रमाणे अनुदान त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे हे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले