पिंपरी चिंचवड शहरात घरफोडी करणारी टोळी अटक

19 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे : 

पिंपरी चिंचवड शहरात घरफोड्या करणाऱ्या सीएम टोळीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  चार जणांच्या या टोळीकडून तब्बल 381 ग्रॅम सोन्याचे दागिने, एक किलो चांदीचे दागिने आणि अन्य साहित्याचे असा एकूण  19 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 अनंत माने,  राजू बंगाली , रामजाने क्षिरसागर, अमोल ऊर्फ भेळया, अरुण माळी ऊर्फ घुगे  अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या कारवाईमुळे चिंचवड पोलीस ठाण्यातील दोन, निगडी चार, देहूरोड दोन आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एक असे एकूण नऊ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.