मुकुंदनगरच्या ज्येष्ठ नागरिक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा पडली पार

आमदार संग्राम जगताप यांचा अभिनंदनाचा ठराव

आमदार जगताप यांनी दिलेल्या 56 लाखाच्या निधीतून सभागृहाचे काम प्रगतीपथावर

नगर (प्रतिनिधी)- फकिरवाडा, दर्गादायरा, मुकुंदनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत ज्येष्ठ नागरिक संघाच्या कंपाउंड वॉल व सभागृहासाठी 56 लाखांचा निधी दिल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांचे आभार मानून, तिसऱ्यांदा आमदारपदी निवडून आल्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.
वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून हाजी शौकत तांबोळी, हाजी लतीफ मलबारी, माजी नगरसेवक आसिफ सुलतान, फारुक भाई, नवेद बिजापुरे, हाफिज कादरी, अध्यक्ष हाजी खानसाहब उस्मानमिया शेख, उपाध्यक्ष हाजी शेख रउफ मोहम्मद (बिल्डर), कार्याध्यक्ष हाजी खान आलम शफी, सचिव पठाण बशीर अब्दुल, सहसचिव हाजी शेख फकिर मोहम्मद ईमाम, खजिनदार पठाण इस्माईल हबीबखाँ, कार्यकारणी सदस्य हाजी शेख बिलाल अहमद, हाजी शेख अब्दुलकादीर गुलामरसुल, शेख अब्दुलरहिम (गोटु जहागीरदार), पठाण इब्राहिम हबीबखा, मिर्झा नवेद अंजुम गयासुल हक, शेख हबीब जमाल, सय्यद इकबाल गुलाम दस्तगीर, ॲड. सय्यद मो. अन्वर इब्राहिम, अब्दुल अजीज हैदरमियाँ, शेख गुलामदस्तगीर मोहीद्दीन, शेख इस्माईल पापामियाँ, हाजी शेख अब्दुल सईद हाफिज, सय्यद आरिफ नन्हेमियाँ, हाजी शेख शरफोद्दीन जैनुद्दीन,पठाण हबीब मगबुल, सय्यद नुरमोहंमद बाबासाहेब, कायदेशिर सल्लागार, ॲड. हाफिज जहागीरदार, ॲड. ताज अशरफ सय्यद आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिक संघाच्या स्थापनेला 19 वर्षे पूर्ण होत आहे. आजी-माजी सदस्यांनी मेअराज मस्जिद जवळ 11.15 गुंठे जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या जागेत ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. लोकवर्गणीतून या जागेवर तारेचे कंपाउंड टाकून पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. माजी अध्यक्ष पै. शहा निजाम नन्हेंमिया व मा. कार्याध्यक्ष पै. बशीर पापाभाई शेख यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी संघटना कार्यकारिणीच्या मिटींगमध्ये झालेल्या ठरावानुसार अध्यक्षपदी हाजी खानसाहब उस्मानमियाँ शेख तर उपाध्यक्षपदी हाजी रउफ मोहम्मद शेख (बिल्डर) व कार्याध्यक्षपदी हाजी आलम शफी खान यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे.
नवीन कार्यकारिणीने आमदार संग्राम जगताप यांची भेट घेवून सदर जागेस कंपाउंड वॉल व सभागृह बांधण्याबाबत निवेदन दिले होते. त्याची दखल घेऊन आमदार जगताप यांनी तातडीने 56 लाखांचा निधी मंजुर केलेला आहे. तसेच सभागृहाचे काम सध्या सुरु असल्याची माहिती ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने देण्यात आली.
उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी ज्येष्ठ नागरिक संघास आर्थिक मदत दिली. या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या वार्षिक कार्याचा आढावा घेऊन, सदर जागेत झाडे लावणे, जॉगिंग ट्रॅक तयार करण्याचे काम प्रस्तावित करण्याचे नियोजन करण्यात आले. तर विधवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी व्यावसायिक प्रशिक्षण कार्यशाळा घेणे, युवकांसाठी वाचनालय उभारणे, ज्येष्ठ नागरिक भवनला सेवानिवृत्त आरटीओ सय्यद शहा नन्हेमिया यांचे नाव देण्याचा ठराव घेण्यात आला.