नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शौर्या गवळी याची निवड.

नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर येथील पेमराज सारडा महाविद्यालय येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय विभाग स्तरीय  मिनि गोल्फ खेळाच्या सामन्यांमधे एकेरी प्रकारात नगर  कल्याण रोड, जाधवनगर येथिल  श्री.चैतन्य टेक्नो स्कुलच्या इयत्ता ६ वी ची विद्यार्थीनी शौर्या शैलेश गवळी हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्षन करत १४ वर्षाखालील मुलीच्चा गटात द्वितीय क्रमांक पटकावले असुन नागपूर येथे होणाऱ्या राज्य स्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल शाळेच्या प्राचार्या सौ.अन्सी, डीन सुमन सर तसेच क्षेत्र विस्तार अधिकारी शशि कुमार यांनी शौर्या चे कौतूक करत शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला व राज्य स्तरीय स्पर्धासाठी शुभेच्छा दिले श्री चैतन्य टेक्नो स्कूल अभ्यासाबरोबर क्रीडा व कला क्षेत्रातही प्रोत्साहन देते. या साठी आवश्यक तज्ञ शिक्षक वर्ग शाळेत असतल्याचा सार्थ अभिमान प्राचार्यानी व्यक्त केला. तर शाळेच्या विद्यार्थ्यांनी सॉफ्ट बॉल व्हालीबॉल, जलतरण, थ्रोबॉल, मैदानी स्पर्धा या सर्वामधे जिल्हा स्तरावर बाजी मारल्याचे प्राचार्यानी सांगीतले. मिनि गोल्फ खेळाच्या जिल्हा स्तरीय स्पर्धेमध्ये शाळेच्या शौर्या गवळी व अराध्या ठाणगे यांनी अनुक्रमे प्रथम व व्दितिय क्रमांक पटकावला होता. विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा प्रमुख सुनिल मोहिते, क्रीडा शिक्षक आदित्य क्षिरसागर व कोमल कुंद्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून या निवडीबद्दल खेळाडूचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.