नॅशनल अबॅकसच्या ऑनलाईन स्पर्धेत ग्रेड प्लसचे 7 विद्यार्थी चमकले

विविध गटात मिळवले यश

अहमदनगर (प्रतिनिधी)- स्मार्ट किड्स नॅशनल अबॅकसच्या ऑनलाईन स्पर्धेत नगर शहरातील ग्रेड प्लस अकॅडमीचे 7 विद्यार्थी चमकले. किचकट व अवघड गणित प्रक्रिया काही मिनिटामध्ये सोडवून विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखविले.
नुकतीच ही स्पर्धा ऑनलाईन पार पडली. यामध्ये देशातील विविध शहरातून दीड हजारपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये अ गटात प्रथम- अन्वी खरमाले, द्वितीय- आरुष जोशी, तृतीय- राजवीर थोरात, पाचवा- ओवी शिदोरे, ब गटात द्वितीय- रुद्र पटेल, क गटात प्रथम- स्वप्रीत गुंड, ड गटात तृतीय- सचिन पाटील यांनी यश संपादन केले. या स्पर्धेतील विद्यार्थ्यांना अकॅडमीचे संस्थापक प्रतिक शेकटकर व शाहीन शेकटकर यांचे मार्गदर्शन लाभले. या गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.