श्रीराम मंदिर नवीपेठ येथे श्रीरामलल्ला प्रतिष्ठाव्दादशी सोहळास प्रारंभ
श्रीराम जय राम जय जय राम जपाने श्रीराम मंदिरपरिसर दुमदुमतोय
नगर- अयोध्या येथील श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा वर्षपुर्ती दिनानिमीत्त आज पहिल्या दिवशी श्रीराम जय राम जय जय राम जपाने नवीपेठ येथील श्रीराम मंदिर परिसर दुमदुमतोय…. या जपात भक्तीभावाने भाविक भक्त तल्लीन होत आहेत, श्रीराम जय राम जय जय राम हा जप अखंड 24 तास करण्यात येणार आहे. श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्टच्यावतीने श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा व्दादशी सोहळा निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने मंदिरास फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. त्यामुळे मंदिरपरिसरात भक्तीमय वातावरण तयार झाले आहे. सर्वत्र एक मंत्र ऐकू येत आहे… श्रीराम जय राम जय जय राम…. सकाळ पासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. ट्रस्टच्या सर्व पदाधिकर्यांनी भगवी टोपी आणि कुर्ता परिधान केल्या एक वेगळीच रोनक दिसून येत होती. येणार्या सर्व भाविकांना प्रसाद वाटप होत आहे.
अयोध्या येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला एक वर्ष पुर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळाच्यावतीने हा सोहळा साजरा करण्यात येत आहे. यामध्ये आज सकाळी अखंड 24 तास ॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥ या तारक मंत्राचे नामस्मरणरुपी संगीत अनुष्ठान संपन्न होत आहे. दि.08 जानेवारी रोजी रात्री 8.00वा. भक्तीरंग प्रस्तुत रामायणाचार्य श्री. गोरक्षनाथजी दुतारे महाराज (मुंबई दुरदर्शन कलाकार) यांची श्रीराम भजन सेवा (भजन संध्या) व कार्यक्रमा उपरांत महाप्रसाद., दि. 09 जानेवारी रोजी रात्री 8.00 वा. प.पु. स्वामी श्री गोविंददेव गुरुजी महाराज यांचे कृपापात्र शिष्य पं. गिरीराजजी व्यास (पुणे निवासी) यांचे सुमधुर वाणीत श्री संगीतमय सुंदरकांड (भक्तीमय संगीत कार्यक्रम) व कार्यक्रमा उपरांत महाप्रसाद., दि. 10 जानेवारी रोजी रात्री 8.00 वा. सुप्रसिध्द पं. राजेंद्र शर्मा (रामवाला) – सुप्रसिध्द गायक सी.ए. सागर शर्मा (नागपुर निवासी) प्रस्तुत ॥ एक शाम प्रभु श्रीराम के नाम ॥ (भजन संध्या) व कार्यक्रमा उपरांत महाप्रसाद., दि.11 जानेवारी रोजी सकाळी 9.00 ते दुपारी 12.00 श्रीरामलल्ला प्रतिष्ठा व्दादशी सोहळ्यानिमीत्त सामुहिक महा हनुमान चालिसा पठण व महाआरती दरम्यान सामुहिक भव्य शंखनाद व घंटानाद., सायं. 7.00 वा. ढोलपथकाचे स्थीर वादन, असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
तरी सर्व कार्यक्रमास शहरवासियांनी जास्तीत जास्त संख्येने सहकुटूंब उपस्थीत राहुन प्रभु श्रीरामांच्या कृपाशिर्वादाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.