77 व्या निरंकारी समागमाच्या सेवांचा विधिवत शुभारंभ

सेवेमध्ये कोणताही भेदभाव न बाळगता ती निष्काम भावनेने करावी- सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज

नगर – सेवा करताना सेवेकडे भेदभावाच्या दृष्टिने पाहू नये तर निरिच्छत, निष्काम भावनेने सेवा करायला हवी. सेवा तेव्हाच वरदान ठरते जेव्हा त्यामध्ये कोणताही किंतु, परंतु नसतो. सेवेसाठी कोणत्याही काळावेळाचे बंधन असू नये. समागमाच्या दरम्यान किंवा समागम संपेपर्यंतच सेवा करायची आहे असे नाही तर पुढील संत समागमापर्यंत सेवेची ही उत्कट भावना कायम टिकून राहायला हवी. ही तर निरंतर चालत राहणारी प्रक्रिया आहे. सेवा नेहमीच सेवाभावनेने युक्त होऊनच करायला हवी. असे केल्याने आपण शारीरिक रुपाने असमर्थ असलो तरीही सेवा कबूल होते. कारण ती सेवाभावनेने युक्त असते, असे प्रतिपादन समागम सेवेच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित विशाल सत्संग समारोहाला संबोधित करताना सतगुरु माता सुदिक्षाजी महाराज यांनी केले.
सतसुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी त्यांच्या पावन सान्निध्यात 16 ते 18 नोव्हेंबर पर्यंत 77 वा वार्षिक निरंकारी समागम संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ,समालखा येथे संपन्न होणार असून 600 एकरच्या विशाल मैदांनावर आयोजित संत समागमात देश-विदेशातून लक्षावधी भक्त सहभागी होतील. मानवतेच्या महाकुंभ मेळ्यात सहभागी भक्तगण संत समागमातील शिकवणूकीतून आपली मन उज्वल करण्याचा प्रयास करतील.
या संत समागमाची भूमी सगागम कार्यक्रमासाठी तयार करण्यासाठी सेवेचा शुभारंभ नुकताच सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि राजपिता रमितजी यांच्या शुभहस्ते समालखा येथे करण्यात आला. याप्रसंगी मिशनच्या कार्यकारीणीचे सर्व सदस्य, केंद्रीय सेवादल अधिकारी व सेवादलाचे महिला व पुरुष सदस्य तसेच सत्संगचे हजारो अनुयायी उपस्थित होते.
याविशाल समागम स्थळावर लाखो संतांच्या राहण्याची, भोजनाची, आरोग्याची तसेच अनेक आत्यावश्याक व्यवस्था केल्या जातील. ज्यासाठी अनेक ठिकाणाहून भक्तगणे येऊन महिनाभर निष्काम भावनेने सेवारत राहतात. या पावन संत समागमामध्ये सर्व थरातील संत व सेवादल भक्तगण सहभागी होऊन एकत्वाच्या दिव्य रुपाचा आनंद प्राप्त करतील.
निरंकारी संत समागम, ज्याची प्रतीक्षा प्रत्येक भक्त वर्षभर करतात तो एक असा दिव्य उत्सव आहे जिथे असीम प्रेम, असीम करुणा, असीम विश्‍वास आणि असीम समर्पणाचा भाव असीम परमात्म्याच्या ज्ञानाच्या आधाराने सुशोभित होतात. मानवतेच्या या उत्सवामध्ये समस्त धर्मप्रेमींचे स्वागत आहे.