शनिशिंगणापूर ते हिंगोणी रस्त्यावरील किशोर शेटे यांच्या कपाशीच्या शेतात बेवारस ड्रोन सापडल्याने परिसरात एकच घबराट पसरली. हि गोष्ट वाऱ्यासारखी पसरल्याने बघ्यांची गर्दी जमा झाली होती . मात्र, या ड्रोनच्याजवळ जाण्याचे कुणीच घाडस केले नाही. अखेर यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिस निरीक्षक खगेंद्र टेमेकर व पथकाने भेट देऊन बेवारस ड्रोन ताब्यात घेऊन खात्री केली असता सापडलेला ड्रोन खेळण्यातील असल्याचे सांगितले आहे. ड्रोनवर कुठल्याही कंपनीचे लेबल नव्हते. त्याचे वजन ९८ ग्रॅम असल्याचे पोलिसांनी सांगितले. ड्रोन बनावट असले, तरी त्याचा तपास केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. सध्या एकीकडे ड्रोनच्या साहाय्याने शेतीवर औषध फवारणी होत असली तरी या ड्रोनमुळे अनेक अनिष्ट गोष्टींना आमंत्रण मिळते त्यामुळे अशा प्रकणांमध्ये पॉलिसी खाक्या नक्कीच गरजेचं ठरतो.