अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना सरकारची 154 कोटींची मदत
जानेवारी ते ऑक्टोबर पर्यंतच्या बाधितांचा समावेश
राज्यात विविध भागात झालेल्या अवेळी पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानी पोटी बाधितांना तीन टप्प्यात 154 कोटींचा मदत निधी वितरित करण्यास राज्य सरकारने गुरुवारी मंजुरी दिली. जानेवारी ते जून 2023 या कालावधीत आवेळी पावसामुळे शेत पिकांच्या नुकसानी पोटी नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, पुणे आणि नागपूर विभागीय आयुक्तांनी पाठविलेल्या प्रस्तावानुसार 9 कोटी 80 लाख 72 हजार तर जून ते ऑक्टोबर या कालावधीतील नुकसानी पोटी नाशिक छत्रपती संभाजी नगर नागपूर आणि कोकण विभागीय आयुक्ताने पाठवलेल्या प्रस्तावानुसार 136 कोटी 61 लाख 6 हजार रुपयांचा निधी वितरित करण्याची मंजुरी दिली आहे. सप्टेंबर मध्ये नागपूर शहरातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे रस्ते घरे व इतर मालमत्तेच्या नुकसान भरपाई पोटी आठ कोटी 38 लाख 54 हजार इतक्या निधीस मंजुरी दिली आहे. 33टक्के पेक्षा जास्त नुकसान झाल्यास दोन हेक्टर च्या मर्यादित ही मदत दिली जाणार आहे.