ऑनलाईन सहजयोग ध्यानाचा नगरकरांनी लाभ घ्यावा –   आ. संग्राम जगताप 

ऑनलाईन सहजयोग ध्यानाचा नगरकरांनी लाभ घ्यावा –

आ. संग्राम जगताप

विनामूल्य ऑनलाईन सहजयोग ध्यान कार्यक्रम दिनांक 20 जुन रोजी सायं.5.00 वा यु ट्यूब चॅनेल वर

नगर – प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग प्रतिष्ठान पुणे येथून संपूर्ण महाराष्ट्र भर सहजयोग ध्यान कार्यक्रम दिनांक 20 जुन रोजी सायं.5.00 वा यु ट्यूब चॅनेल वर प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचे भित्ती फलकाचे अनावरन आ. संग्राम जगताप यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी अहमदनगर जिल्हा सहजयोग पदाधिकारी उपस्थित होते.

या उदघाटन प्रसंगी बोलतांना आ. संग्राम जगताप म्हणाले सहजयोग ध्यान साधन ही खरोखरच चांगली ध्यान साधना आहे या मुळे मनुष्याला शांतता प्रस्थापित होऊन त्याला संतुलन प्राप्त होते. आज प्रत्येक जण कोरोना महामारीमुळे असंतुलन झालेला असून नागरिक भयभीत झालेला आहे. ही ध्यान साधना केल्यानंतर मानवा मध्ये निर्भयता येते यासाठी नगरकरांनी ऑनलाईन सहजयोग ध्यान साधनेचा लाभ घ्यावे असे आवाहन केले.

यावेळी सदर भित्ती फलक संपूर्ण अहमदनगर शहर व जिल्ह्यात लावणार असून जास्तीत जास्त नागरिकांना सहजयोग ध्यान साधनेचा कसा उपयोग होईल या साठी प्रयत्न केले जातील असे सहजयोग परिवाराच्या वतीने जाहीर करण्यात आले.

या प्रसंगी अहमदनगर जिल्हा प्रचार प्रसार प्रमुख कुंडलिक ढाकणे गणेश भुजबळ, चंद्रकांत रोहकले अंबादास येन्नम, अमित बुरा, नंदूशेठ एकाडे व श्रीनिवास बोज्जा आदी उपस्थित होते.