वाढदिवसानिमित्त नगरच्या तरुणाचा अनोखा उपक्रम

इतर खर्चाला फाटा देत रक्तदान शिबिराचे आयोजन

 

अहमदनगर

 

गेल्या दीड वर्षांपासून जग कोरोना महामारीशी अविरत  लढा  देता आहे. या काळात  कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना ऑक्सिजन आणि रक्ताची जास्त गरज पडली. या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी अनेक मांडले, समाजसेवी संस्था मदतीला आल्या. या काळात अनेक युवकांनी वाढदिवसाप्रीत्यर्थ तसेच महापुरुषांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरे आयोजित केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज नगरमध्ये अनिकेत बबन आवारे या तरुणाने २५व्या वाढदिवसानिमित्त जनकल्याण रक्तपेढी या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

 

हे ही अवश्य पहा, आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा 

 

समाजसेवेची आवड असणाऱ्या अनिकेत ने आणि त्याच्या सर्व मित्र परिवाराने एकत्र येऊन  हा उपक्रम घडवून आणला. एवढेच नव्हे तब्बल 50 रक्ताच्या पिशव्या संकलित करून एक आदर्श तरुणाई पुढे ठेवलाय. वाढदिवसानीमित्त मोठमोठ्या हॉटेल्स मध्ये पार्टी करणाऱ्या तरुणाई पुढे अनिकेत ने  ह्या रक्तदान शिबिराचे आयोजन  उपक्रमाच्या माध्यमातून वेगळाच आदर्श ठेवलाय.

 

 

कोरोना काळात एकट्या माणसाने घडवून आणलेल्या रक्त संकलनात एवढा प्रतिसाद मिळाला. म्हणून  जनकल्याण रक्तपेढी चे झेंडे सर यांनी ह्या तरुणाचे खूप अभिनंदन केले.  तसेच अनिकेत आवारे यांनीही प्रत्येक तरुणाला आवाहन केले की अश्या प्रकारे वाढदिवस साजरे करून जो रक्ताचा तुटवडा आहे तो भरून काढावा. तसेच मुख्य उपस्थित वाहतुक शाखेच्या पुष्पा सोनवणे ह्यांनी ही रक्तदान केले.