मोहंमद पैगंबर यांचे पवित्र केस आज दुपारपर्यंत दर्शनासाठी खुले.

शुक्रवारी भव्य झेंडा मिरवणूक निघणार.

अहमदनगर (प्रतिनिधी)- मोहंमद पैगंबर यांच्या जयंती ईद मिलादुन्नबी (झेंडा ईद) ही सोमवारी दि.१६ सप्टेंबर रोजी होती मात्र गणेशोत्सवानिमित्त मिरवणूक न काढता २० सप्टेंबर रोजी सर्वत्र उत्साहात साजरी होणार आहे. व सोमवारी ईद घरोघरी साजरी करण्यात येणार आहे. या निमित्त सालाबाद प्रमाणे शहरातील टकटी दरवाजा (मीर मुर्तूजा टकटी दरवाजा महल) येथे मोहंमद पैगंबर यांचे पवित्र केस (हजरत बाल) भाविकांच्या दर्शनासाठी दुपारपर्यंत खुले केले आहेत व शुक्रवारी संपूर्ण दिवसभर चालू राहणार आहे. तसेच यावेळी विविध धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या पवित्र केसाच्या दर्शनासाठी भाविक येत आहे. शुक्रवारी दर्शनासाठी भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन येथील पुजारी सय्यद बुर्‍हाण कादरी चिश्ती यांनी केले आहे. नगरला परंपरेनुसार दरवर्षी फक्त हजरत मोहंमद पैगंबर यांच्या जयंतीदिनीच पवित्र केस दर्शनासाठी खुले करण्यात येते व शुक्रवारी देखील केस दर्शनासाठी खुले राहणार आहे व नगर शहरातून झेंड्याची मिरवणुक काढण्यात येवून, ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप केले जाते.