पेपर फुटी बाबतचा कायदा आणणार

स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने पेपर फुटी संदर्भात राज्य सरकार अतिशय गंभीर आहे. राज्यातही अशा प्रकारचा कायदा आणण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. पेपर फुट व गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातच कायदा आणणार असल्याचे व यापुढे गट क वर्गाच्या रिक्त पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रश्नोत्तरांच्या तासात दिली. राज्यात सातत्याने होणाऱ्या पेपरफुटीबाबत विधानसभा सदस्य बाळासाहेब थोरात यांनी प्रश्न उपस्थित केला होता, यावेळी सदस्य राजेश टोपे आशिष शेलार प्रकाश आंबेडकर रोहित पवार यांनीही पेपर फुटीचे अनुषंगाने उपप्रश्न उपस्थित केले रोहित पवार यांनीही सभागृहाला धारेवर धरताना गेल्या अनेक वर्षात जवळजवळ सर्वच होणाऱ्या भारतीय भरतीला पेपर फुटीचा शाप लागलेला आहे. त्यामुळे या अधिवेशनात पेपर फुटी संदर्भात सरकार कायदा करणार का? असा प्रश्न विचारला होता, त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, याच अधिवेशनात पेपरफुटी रोखण्यासंदर्भात कायदा आणला जाईल. त्याबरोबरच दोन वर्षात एक लाख पदे भरण्याची ऐतिहासिक कामगिरी या सरकारने केली आहे. सरकारने 85,000 पदे भरतीची घोषणा केली होती. त्यापैकी 57,452 जणांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहे. तर 19853 जणांना नियुक्तीचे आदेश देण्याची कार्यवाही सुरू आहे. 31,201 पदांसाठी भरतीची कार्यवाही सुरू आहे. यापुढील काळात निरंतर भरती प्रक्रिया सुरू राहील. गट क वर्गाच्या रिक्त पदांची भरती यापुढे एमपीएससी मार्फत करण्यात येणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. राज्यात एक लाखांहून अधिक तरुणांना कोणतीही अडचण न येता गेला दोन वर्षात नोकऱ्या देण्यात आलेल्या आहे. एखादा अपवाद वगळता ही सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडली. तरीही पेपरफुटी संदर्भातील कायदा याच अधिवेशनात आणला जाईल. अशी ग्वाही फडणवीस यांनी प्रश्न उत्तराच्या तासात दिली. पेपर फुटीचे चुकीचे कथन पसरवणाऱ्या वेबसाईटवर गुन्हा दाखल करण्यात येईल असे ते दाखल केला जाईल असे ते यावेळी म्हणाले. तलाठी भरती प्रक्रियेत कोणताही गोंधळ नव्हता, तरीही गदारोळ झाल्याने ती प्रक्रिया नव्याने करत आहोत. पेपर फुटीचे प्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्रावरील कर्मचारी आयत्यावेळी ठरवले जातील. आणि त्यांच्यावरील निरीक्षक नेमण्यात येतील असेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.