अपर पोलिस अधीक्षकांना वाहतूक कोंडीला द्यावे लागले तोंड, लावले बॅरिकेट्स,
परिणामी, आजपासून मिस्कीन मळ्याकडून ताराकपूरकडे 'नो एन्ट्री'
शहरात सध्या अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहेत. त्यामुळे वाहतुकीचे मार्ग बदलले आहेत. परिणामी नगरकरांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. तारकपूर, अप्पू हत्ती चौक, दिल्लीगेट अशा रहदारीच्या रस्त्याचे काम सुरु असल्याने नगरचा दिल्लीगेट आणि सावेडी परिसरातील नागरिकांना जोडणारे न्यू आर्ट्स कॉलेजचा रोड आणि बालिकाश्रम रोड असे २ मुख्य रस्ते आहेत पैकी अप्पू चौकात रस्त्याचे काम चालू असल्याने बालिकाश्रम रस्त्यावर गर्दी होताना दिसते. त्यातच पेमराज सारडा महाविद्यालयासमोर वन वे चालू असून येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी त्याचा वापर केला जातोय. मात्र काल याच परिस्थितीत अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे हे सुद्धा याच वाहतूक कोंडीत अडकले. अर्ध्या तास या वाहतुकीत अडकल्याने स्वतः प्रशांत खैरे खाली उतरले आणि त्यांनी या वाहतुकीला योग्य पद्धतीने मार्गस्थ करण्यासाठी सूत्र हाती घेतली आणि या वाहतूक कोंडीला आवर घालण्यासाठी आजपासून मिस्कीन मळ्याकडून तारकपूरकडे होणारी वाहतूक थांबवली आहे. त्यामुळे तारकपूरकडून येणारा गर्दीचा लोंढा कमी झाल्याने काही प्रमाणात अप्पू चौकातली वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे