…या माजी नगरसेवकासाठी विधानसभेचा अर्ज नेऊन केला निवडणुकीचा श्री गणेशा..
प्रसाद कोरडे यांनी घेतला अर्ज
नगर शहर विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाने शिंदे गटाकडून नाही तर मनोज जरांगे समर्थक म्हणून निवडणुकीत उभे राहण्याची घोषणा केली आहे आणि त्यांनी आपले निवडणूक प्रमुख प्रसाद कोरडे यांच्यामार्फत नगर शहराच्या तहसील कार्यालयातून रीतसर 100 रुपये रक्कम भरून उमेदवारी अर्ज नेला आहे.शिंदे समर्थक आणि जरांगे समर्थक मदन आढाव पाटील यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून त्या अगोदर पासूनच त्यांनी तयारी सुरू केली होती.शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नगरसेवक मदन आढाव यांनी आपल्या नगरसेवक पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला होता . मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी करता मनोज जरंगे पाटील हे अंतरवाली सराटीमध्ये अनेक दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते , मात्र सरकार याकडे गांभीर्याने पाहत नसून या उपोषणावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे अशा सरकार सोबत राहून आपल्या पदाचा काही उपयोग नाही, अस म्हणत मदन आढाव यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन पक्षाचा देखील राजीनामा पक्ष प्रमुखांकडे दिला होता .या सर्व राजकीय घडामोडी नंतर मदन आढाव हे मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आमदारकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. मदन आढाव यांच्या वतीने प्रसाद कोरडे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात अर्ज घेऊन गेले आहेत .म्हणून जरांगे समर्थक म्हणून या निवडणुकीत आणखी कोण कोण उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.