पूजा खेडकरच्या आईला महाडमध्ये अटक
पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी डॉ. पूजा दिलीप खेडकर यांच्या आई मनोरमा यांना, पुणे ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी सकाळी महाड या ठिकाणहून अटक केली. त्या इंदुबाई ढाकणे हे नाव बदलून तेथील एका घरात लपून बसल्या होत्या. पूजा खेडकर प्रकरण गाजत असतानाच आता पूजा खेडकर यांच्या आईला एक वर्षापूर्वीच्या पुणे जिल्ह्यातील घडवली या गावात एका जागेच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या गावातल्या एका शेतकऱ्याच्या जागेवर ताबा मिळवण्यासाठी पूजा खेडकर यांच्या आईने त्या शेतकऱ्याला धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे. वर्षभरापूर्वी हे प्रकरण घडले होते. मात्र पूजा वादग्रस्त ठरल्यानंतर, हे प्रकरण पुन्हा ताजे झाले आहे. या संदर्भातील एक व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओच दखल घेत कदाचित या प्रकरणाला एक नवीन यु टर्न मिळू शकतो. असे म्हटले जात आहे.