राधिका अ‍ॅकॅडमीच्या नृत्य नाटिकेने उपस्थितांना केले मंत्रमुग्ध वार्षिक स्नेहउत्सवात विद्यार्थ्यांनींनी सादर केली ‘ कृष्ण लीला’ नृत्य नाटिका

नगर –    कल्याण रोड, आदर्शनगर येथील राधिका अ‍ॅकॅडमी भरतनाट्यम वार्षिक स्नेहउत्सवात विद्यार्थ्यांनींनी सादर केलेल्या कृष्ण लिला, माखन चोरी, कालिया युद्ध आणि कंस मर्दन  या नृत्य नाटिकेस रसिक प्रेक्षक, पालकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

     कल्याण रोड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन येथे झालेल्या या उत्सवास प्रमुख पाहुणे प्रमुख पाहुणे सौ अश्‍विनी भोरे – झावरे आणि प्राचार्य आदेश चव्हाण उपस्थित होते. यावेळी पारुनाथ ढोकळे ,सुरेखा ढोकळे,माजी  महापौर शीलाताई शिंदे, रोहिणी शेंडगे तसेच दत्तात्रय गाडळकर,संतोष दसासे, संगीता दसासे आदी मान्यवर उपस्थित होते.

      या कार्यक्रमासाठी संचालिका सौ कविता भाबंरे घोलप यांनी दिलेल्या माहितीनुसार भरतनाट्यम शास्त्रीय नृत्य कला सादर करताना पारंपारिक रचना जसे अलारीपू कौत्वम् जतीस्वरम, तिल्लाना याच बरोबर नृत्य नाटिका कृष्ण लीला सादर करण्यात आली.

      यामध्ये विश्‍वा काकडे,कार्तिकी नजर,समीक्षा गुंजाळ,अनुष्का सुंबे,पूर्वी नाटाळे,मृणाल डोईफोडे,दूर्वा मवाळ ,रुजवी सोनवणे,वेदश्री कावरे,मनस्वी कावरे,शर्वरी खताळ,सान्वी ठाणगे,रिवा राऊत,रेणुका खांदे,ओवी गायकवाड,आराध्या कवाष्टे ,श्रावणी काकडे,रीतीशा कोरडे,हिमानी बोरुडे,प्रगती अग्रवाल,इशिका भागवत,संतानिका लोडे,वेदांगी बोराडे, तृप्ती आगरकर, रेवती बनबेरू,प्रणाली रसाळ, वेदिका गावडे ,ईश्‍वरी कवाष्टे ,तनिष्का दळवी, प्रचिती शिंदे ,रेणुका शिंदे,सिद्धी अडेप ,आराध्या बूरा ,तनिष्का बुरा, मृणालिनी शेरकर तसेच विशारद -सिध्दी गांधी,तुलसी ओस्तवाल ,शिवानी सुपेकर  उलेखणीय रोशनी माळी – भांबरे आदींनी सहभाग घेतला.

     सूत्र संचालन सौ चित्रा गटने – जोशी यांनी केले,  विशेष आभार इव्हेंट मॅनेजमेंट जालिंदर शिंदे, फोटोग्राफी सचिन अगरवाल,सहायक आर्किटेक्ट तुषार भांबरे, मंदार फुलारी, सी ए रवी आरसुळे यांचे करण्यात आले.