आज दि. 19/11/2020 रोजी श्री.संदिप मिटके DYSP श्रीरामपूर विभाग,अहमदनगर यांना राहुरी शहरातील हॉटेल न्यू भारत येथे सय्यद फरहाद इर्शाद अहमद उर्फ दानिश रा. राहुरी हा परप्रांतीय ( बंगाली) महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत आहे असे खात्रीशिर बातमी मिळाली.
त्याप्रमाणे मा.श्री. मनोज पाटील पोलिस अधीक्षक अहमदनगर, मा. श्री अग्रवाल प्रभारी अपर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर याचे सूचना व मार्गदर्शन प्रमाणे श्री.संदिप मिटके DYSP श्रीरामपूर विभाग,अहमदनगर यांनी श्री नोपाणी प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर शहर , श्री अभिनव त्यागी व कर्मचारी यांचे पथक तयार करुन हॉटेल न्यू भारत येथे बनावट ग्राहक पाठवुन शासकीय पंचासमक्ष छापा टाकुन तीन पिडीत महिलांची सुटका केली असून आरोपी सय्यद फरहाद इर्शाद अहमद रा. राहुरी यांस ताब्यात घेण्यात आलेले आहे.
आरोपी विरुध्द राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे प्रचिलीत कायदयान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम चालु आहे.
श्री.संदिप मिटके DYSP श्रीरामपूर विभाग,अहमदनगर श्री नोपाणी प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांनी श्रीरामपूर येथील यांनी श्रीरामपूर, श्री त्यागी यांनी नेवासा पोलिस स्टेशन येथील पदभार स्विकारल्यापासुन अवैध धंदयांवर होत असलेल्या कारवाई मुळे अवैध धंदयांची धाब दणालले आहेत. पोलिसांच्या या करावयाचे समाजातील सर्व घटकांतुन कौतुक होत आहे.