कुंथत कुंथत सरकार चालत नसतं – राज ठाकरे

मुंबई :

सर्वसामान्य जनतेला आलेल्या वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी आज थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतलीय. राज्यात अनेक प्रश्न अडकले आहेत, अकरावी प्रवेश रखडलाय . रस्त्यावर ट्रॅफिक आहे, पण रेल्वे सुरू होत नाही. रेस्टॉरंट सुरू आहेत मंदिरं नाहीत. ही काय धरसोड सुरू आहे ? कशासाठी कुंथताहेत ? असं कुंथत कुंथत सरकार चालत नाही,’ असा सणसणीत टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महाआघाडी सरकारला मारला आहे.

 

‘लोकांना भरमसाठ वीज बिले येताहेत. मनसे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करतेय. वीज बिले कमी करण्याची मागणी आम्ही केलीय. अदानी व बेस्टने हा मुद्दा वीज नियामक आयोगावर ढकललाय. तर, कंपन्या आपला निर्णय घेऊ शकतात असं एमईआरसीनं म्हटलंय.
लवकरच यावर निर्णय होईल असं सरकारचं म्हणणं आहे. पण तो होत नाही म्हणून आम्ही आज राज्यपालांना भेटलो. त्यांना या संदर्भात एक निवेदन दिलं आहे,’ असं राज ठाकरे यांनी सांगितलय.

सरकार आणि राज्यपालांचं सख्य बघता हा विषय किती पुढं जाईल याबद्दल साशंकता आहे. किमान राज्यपाल हा विषय सरकारपुढं मांडतील,’ अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलीय.