हल्ल्याच्या भीतीनेच पाकिस्तानकडून विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका 

 

नवी दिल्ली :

भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारताकडून हल्ला होण्याच्या भीतीनेच सोडलं, असं पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ पाकिस्तानी संसदेत बोलताना स्पष्ट केलं आहे.पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर कितीही कुरघोडी करण्यात येत असल्या तर पाकिस्तानच्या मनात भारत आणि मोदी सरकारची किती भीती आहे, याची कबुलीच या वाक्यातून पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांनी दिली आहे.
विंग कमांडर अभिनंदन यांना भारताबद्दल असणाऱ्या भीतीपोटी सोडण्यात आलं. पाकिस्तानी सरकारच्या मनात भारताबद्दल अशी काही भीती होती, की त्यांनी कुठलाही वेळ वाया न घालवता विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना तत्काळ मुक्त केलं आणि भारतासमोर गुडघे टेकले. भारताला खूश करण्यासाठी अभिनंदन यांना सोडण्यात आल्याचंही ख्वाजा मोहम्मद आसिफ म्हणालेत.
  २६ फेब्रवारी २०१९ मध्ये भारतील सैन्याकडून बालाकोटमध्ये एअरस्ट्राईक करण्यातं आलं. त्यावर पाकिस्तानी लष्कर किंवा तिथले सरकार कायम प्रश्न उपस्थित करत असले तरी त्यांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेला खुलासा पाकिस्तानच्या मनातील भारतीय लष्कर आणि मोदी सरकारबद्दलची भीती स्पष्ट करत असल्याचं दिसून आलं आहे.