रेणावीकर विद्या मंदिरात क्रीडा करंडकाचे धूम धडाक्यात उद्घाटन

किशोरवयीन गटाची मुले हीच खरी क्रीडांगणाची संपत्ती- श्रीमती कोमल वाकळे

-अहिल्यानगर मधील नावाजलेली शाळा म. ए. सो. रेणावीकर विद्या मंदिर मध्ये  आज क्रीडा करंडकाचे धूम धडाक्यात उद्घाटन झाले. या सोहळ्याचे उद्घाटन शाळेची माजी विद्यार्थीनी आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू श्रीमती कोमल वाकळे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पद नगर पश्चिम प्रांत संघचालक आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी संशोधक प्राध्यापक मान. श्री.  नानासाहेब जाधव यांनी भूषविले. तर अध्यक्षस्थानी म. ए. सो. नियामक  मंडळाचे  उपाध्यक्ष श्री. प्रदीपजी नाईक  उपस्थित होते .
      या शानदार सोहळ्यात घोष पथकाने सर्वांचे स्वागत केले तर सर्व मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योतीची स्थापना आणि क्रीडा ध्वजावरोहण संपन्न झाले. प्रशालेच्या गानवृंदाने ईश स्तवन आणि स्वागत गीत  सादर केले.
       प्रशालेचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळणारा खेळाडू भावेश पवार याने खेळाडूंना शपथ दिली. तसेच अतिशय सुंदर असे लाठी काठीचे क्रीडा प्रात्यक्षिक प्रशालेच्या चमूने सादर केले.  म. ए . सो.चे अध्यक्ष  बाबासाहेब शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकातून प्रशालेची वाटचाल सांगितली. म ए सो क्रीडावर्धिनी पुणे चे अध्यक्ष  श्री . विजय भालेराव यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून देऊन स्वागत सत्कार केला.
    श्रीमती कोमल वाकळे यांनी खेळाडू विद्यार्थ्यानी किशोरवयीन गटापासूनच  आपल्या खेळा प्रतीच्या लक्ष्याचा वेध घ्यावा आणि त्यासाठी कष्ट करावे. किशोरवयीन गटाची मुले हीच खरी क्रीडांगणाची संपत्ती आहे, असे प्रतिपादन केले.
    प्रशालेच्या शाला समितीचे अध्यक्ष  श्री. राजीव जी हजिरनीस सर यांनी या क्रीडा करंडकासाठी प्रशालेच्या तीनही विभागांच्या सर्व कर्मचारी वृंदाने तसेच सर्व पालकांनी नगरकर दात्यांनी दिलेल्या बहुमोल अशा योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
      कार्यक्रमाचे खास आकर्षण असलेला क्रीडा करंडकाचा शुभंकर सिंह याचे भव्य शिल्प देऊन  प्रमोद कांबळे यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शकुंतला आहेरकर यांनी केले तर सर्वांचे आभार मयेसोचे सचिव डॉक्टर श्री अतुल कुलकर्णी यांनी मानले. तसेच परिसरातील नागरिकांनी प्रशालेच्या क्रीडांगणावर चालणारा हा क्रीडा सोहळा पाहण्यासाठी त्याचा आनंद घेण्यासाठी जरूर यावे असे आग्रहाचे निमंत्रणही दिले
       कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी म.ए.सो.चे  सर्व पदाधिकारी तसेच स्थानिक प्रशालेचे मुख्याध्यापक  श्री. राजेंद्र कांबळे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ . ललिता कारंडे आणि  पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजुषा कुलकर्णी यांनी आणि त्यांच्या सर्व टीमने विशेष परिश्रम घेतले.