शाश्वत उत्पन्न तरुणांचा रेशीम शेतीकडे ओढा

रांजणगाव मशीदच्या तरुणाने मिळवले भरघोस उत्पन्न

सुपा: शाश्वत उत्पन्न अनुदानाची तरतूद यामुळे तरुण शेतकरी आता रेशीम शेतीकडे वळत आहे. पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथील अभियंता असलेल्या चंद्रशेखर काळे यांनी रेशीम शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवले आहे. त्यासाठी चार लाखांपर्यंत अनुदान मिळण्याची सुविधा आहे. रेशीम उद्योग वाढीसाठी अनेक सोयी आणि सवलती मिळत असून, कांदा फलोत्पादन, भुसार पिके, भाजीपाला या शेतीला एक चांगला पर्याय म्हणून सध्या अनेक तरुण शेतकरी रेशीम शेतीकडे वळत आहेत. यात कीटक संगोपन गृहासाठी ही अनुदानाची तरतूद असल्याचे रेशम विकास अधिकारी एम. ए. कट्टे यांनी सांगितले. बदलते हवामान, बाजारातील शेतीमालाच्या बाजारभावाची हमी नाही. वाढणारी महागाई यामुळे पारंपरिक शेतकऱ्यांना शेती उद्योग परवडत नाही. पारंपरिक शेती व्यवसाय शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी अपयशी ठरत आहे. शेती व्यवसायापासून अनेक शेतकरी दूर जात आहेत. त्यामुळे काळाची गरज ओळखून शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाव्यतिरिक्त एकात्मिक शेतीचा विचार करणे गरजेचे आहे. लागवड तुती लागवडीसाठी कमीत कमी एक एकर आणि जास्तीत जास्त पाच एकर प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा निश्चित केली आहे. त्यानुसार शेतकरी अनुदानास पात्र ठरतील. एक एकर तुती लागवड संवर्धन व कोष उत्पादनासाठी दोन लाख 18 हजार 186 रुपये अनुदान मिळते.
मजुरी: तुती लागवड, जोपासना, संवर्धन व कीटक संगोपन करण्यासाठी 682 मनुष्य दिवस तसेच कीटक संगोपन गृह बांधकामासाठी 213 मनुष्य दिवस मजुरी दर 273 रुपये अंकुशला साठी दोन लाख 44 हजार 335 रुपये मिळतील.
कीटक संगोपन गृह: निरीक्षण कीटक संगोपन गृहासाठी शेड करता 50 बाय 22 फुटांच्या संगोपन गृह उभारण्यासाठी एक लाख 79 हजार 149 रुपये अनुदान मिळणार आहे. तूती लागवड संवर्धन व कीटक संगोपन गृह मिळवून शेतकऱ्यांना एकूण तीन लाख 97 हजार रुपयापर्यंत अनुदान मिळू शकते.