पुण्यात रिक्षा पंचायतीचे राज्य आंदोलन सुरु
पुणे :
कोरोनाच्या दुर्दैवी फेऱ्यात समाजातील प्रत्येक घटक अडकलेला आहे.अशा परिस्थितीत हातावर पोट आलेल्या कष्टकरी वर्गाचे काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. या वर्गातील गरीब रिक्षाचालकानी कोरोनाकाळात दुर्दैवाचे दशावतार पहिले सरकारने याकडे लक्ष द्यावे यासाठी राज्य रिक्षा पंचायतीने राज्य आंदोलन सुरु केले आहे .
राज्यात रिक्षाचालक राजकीय पक्षाच्या कार्यालयासमोर जाऊन विविध मार्गानी आंदोलने करीत आहेत.
पुण्यातल्या काँग्रेस कमिटी कार्यालयावर रिक्षा चालकांनी मूकमोर्चा काढला आणि मौन आंदोलन करून गांधीगिरी केली .
रिक्षा चालक महामंडळाची स्थापना करून सरकारने रिक्षा चालकांना आर्थिक मदत करावी , पेट्रोल डिझेल चे भाव कमी करावेत त्याच प्रमाणे पेन्शन योजना लागू करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या .