रोबोटची आत्महत्या

रोजच्या कामाच्या प्रेशरला कंटाळून आत्महत्या

दक्षिण कोरियात कामाच्या दडपणाला कंटाळून एका रोबोटने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रोबोटच्या बाबतीत ही पहिलीच घटना आहे.दक्षिण कोरियात एका रोबोटने कामाच्या दडपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा एक प्रकार समोर आला आहे. रोबोटने कामाच्या प्रेशरला कंटाळून आत्महत्या केली. ही जगातली पहिलीच घटना असावी. हा रोबोट दररोज ९ तास कामगार म्हणून ड्युटी करत होता. कामाच्या दडपणाला कंटाळून त्याने पायऱ्यांवरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणाने पुन्हा एकदा एका गंभीर समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. वाढत्या कामाचा ताण सहन न झाल्याने माणसेच नव्हे तर रोबोटसुद्धा आत्महत्या करत असल्याच्या या समस्येने पुन्हा डोके वर काढले आहे. आज आपण सगळेच अतिकामाच्या दबावाखाली असतो. त्यामुळे तणाव आणि चिंता खूप सामान्य बाब झाली आहे. प्रत्येकजण हा ताण सहन करू शकत नाही. ज्यामुळे अनेक जण अशी भीतीदायक पावलं उचलतात.रोबोच्या आत्महत्येनंतर गुमी सिटीतील नागरिक प्रचंड अस्वस्थ झालेत. या पार्श्वभूमीवर गुमी काउन्सिलने कामासाठी रोबो ठेवण्याची योजना थांबवण्याचा निर्णय घेतलाय. काउन्सिलच्या या निर्णयाचे काहींना आश्चर्यही वाटले आहे. कारण दक्षिण कोरिया जगातील अशा देशांपैकी एक आहे, जिथे कंपन्या आणि कारखान्यांमध्ये अतिशय वेगानं रोबो कामासाठी ठेवले जात आहेत. तेथे काउन्सिलनं कामासाठी रोबो न ठेवण्याचा निर्णय घेतल्याने, तो काही जणांना आवडला नाही.