९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : राजधानी दिल्लीत

तब्बल ७० वर्षांनी पुन्हा राजधानी दिल्लीला मान

मुंबई : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव वाढत असतानाच ९८ व्या अखिल भारतीय साहित्य मराठी साहित्य संमेलनाचे बिगुल थेट राजधानी दिल्लीत वाजणार आहे. दिल्लीसोबतच या साहित्य संमेलनासाठी इचलकरंजी,औन्ध, औदुंबर,मुंबई आणि धुळे इथूनही निमंत्रण प्राप्त झाले होते. यासंदर्भात स्थळ निवड समितीने मुंबई, इचलकरंजी आणि दिल्लीला भेट देऊन पाहणी केली होती. यांनतर झालेल्या बैठकीत दिल्लीच्या मध्यवर्ती भागातील ठिकाणांचा विचार करून दिल्लीची अंतिम निवड करण्यात आली. संबंधित साहित्य संमेलन पुढच्या वर्षी फेब्रुवारीत किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते. ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यादृष्टीने दिल्लीतील रसिक वाचक आणि लेखक यांच्यात संवाद व्हावा यासाठी हे संमेलन गती देईल.’ असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष, उषा तांबे यांनी व्यक्त केले आहे.