राष्ट्रीय कराटे क्षेत्रातील सबील सय्यद यांना सन्मान कर्तुत्वाच्या पुरस्काराने सन्मानित.
नगर (प्रतिनिधी) – दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नगर कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह येथे राष्ट्रीय कराटे क्षेत्रातील खेळाडू सबील सय्यद यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल “सन्मान कर्तुत्वाचा” या पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार शिवाजीराव कर्डिले, प्रमुख पाहुणे आमदार संग्राम जगताप, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, प्रांत सुधीर पाटील, डी वाय एस पी अमोल भारती, मनोज कुमार सत्रे, तहसीलदार संजय शिंदे, अभिनव मिठाले, दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शहादेव मुंगसे आदी उपस्थित होते.
सबील सय्यद यांनी कराटे क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. त्यांनी राष्ट्रीय कराटे स्पर्धा व उपमुख्यमंत्री चषक कराटे स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली 300 हून अधिक विद्यार्थ्यांना कराटेचे प्रशिक्षण मिळाले आहे. यातून अनेक विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. कराटेच्या माध्यमातून युवकांमध्ये आत्मविश्वास व शारीरिक क्षमतेचा विकास करण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे. सबील सय्यद यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रातील कराटे क्षेत्राला नवी उंची मिळाली आहे. या गौरवाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.